पिंपरी, दि. १० – राज्य शासनाचा आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ११ व १३ जानेवारी दरम्यान सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर गरजू व गोरगरीब रुग्णांसाठी मोफत अटल महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली. या शिबीरात रुग्णांना झालेल्या गंभीर आजारावर लक्ष्य केंद्रित करण्यात येणार आहे. ह्दयरोग, किडनी तसेच कॅन्सर आजारावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Home Notifications सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर ११ ते १३ जानेवारीदरम्यान मोफत अटल महाआरोग्य शिबीर; आमदार...