उर्से येथील फुड कार्निवल मॉलच्या कर्मचाऱ्यांना जबर मारहाण करुन ५० हजारांच्या हफ्त्याची मागणी

0
432

तळेगाव, दि. १२ (पीसीबी) – पंन्नास हजारांचा हफ्ता देण्याची मागणी करत अज्ञात हल्लेखोरांनी एका फूडमॉल मॅनेजर आणि तेथील कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केली. तसेच आमचा कांदा, बटाटा आणि दूध खरेदी केले नाही, तर जीवे ठार मारु अशी धमकी दिली. ही घटना सोमवार (दि.१०) सायंकाळी चारच्या सुमारास उर्से टोल नाक्याजवळील फूड कार्निवलमध्ये घडली.