पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो मार्ग करण्यासाठी स्थायी समितीने मंगळवारी (दि. ११) हिरवा कंदील दाखवला आहे. या मार्गासाठी महामेट्रोने तयार केलेल्या १ हजार ४८ कोटी २२ लाखांच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली. आता या अहवालाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची अंतिम मान्यता घेण्यात येणार आहे.
Home Notifications पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला...