प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल

0
634

बेळगांव, दि. ११ (पीसीबी) – बेळगावमध्ये प्रक्षोभक भाषण  केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेचतील विरोधी पक्षनेते  धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सोमवारी (दि.१०) मराठी भाषिकांच्या मेळाव्यात मुंडे यांनी प्रक्षोभक भाषण केले होते. या प्रकरणातच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

या प्रकरणी मुंडे यांच्यासह ९ जणांवर आणि शिवसेनेच्या विजय देवणे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.