रत्नागिरीच्या जीडीपीत लक्षणीय वाढ; ६२ उद्योगांसोबत ₹२,१५९ कोटींचे सामंजस्य करार!

bpcauthor
1 Min Read

रत्नागिरी जिल्ह्याचा जीडीपी गेल्या २० वर्षांच्या तुलनेत अनेक पटींनी वाढला असून, या वाढीत स्थानिक उद्योजक, व्यापारी आणि दुकानदारांचा मोठा वाटा असल्याचे सांगण्यात आले आहे.

स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देत ₹२,१५९ कोटींची गुंतवणूक झाल्याची माहिती देण्यात आली. संबंधित प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करून पुढील वर्षी ₹५ हजार कोटींच्या नव्या गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवण्यात आले असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरीतील जिल्हा गुंतवणूक परिषदेत ६२ उद्योग घटकांसोबत सुमारे ₹२,१५९ कोटींचे सामंजस्य करार करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.

Share This Article