किमया कम्युनिकेशन्स आयोजित पिंपरी चिंचवड शहर विकासाचे नेक्स्ट व्हिजन परिसंवाद संपन्न…
दि.१६(पीसीबी)-ऑटो क्लस्टर तारांगण सभागृहामध्ये किमया कम्युनिकेशन्स आयोजित पिंपरी चिंचवड शहर विकासाचे नेक्स्ट व्हिजन हा परिसंवादाचे आयोजन प्राध्यापक जयंत शिंदे यांनी केले होते.यावेळी या परिसंवादाचे अध्यक्ष शहराचे महापौर रवी लांडगे, उद्घाटक ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल आणि प्रतिपादन करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आणि शहरातील जेष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर हे होते.
यावेळी या प्रतिपादनामध्ये चिलेकर यांनी शहरातील एकूणच स्थितीबाबत मांडणी करत आगामी काळात पिंपरी चिंचवड शहराचे व्हिजन हे शहरातील डेव्हलपमेंट सोबतच विचारांची जडणघडण देखील त्यात असली पाहिजे हा मुद्दा प्रामुख्याने मांडला वाढते शहरीकरण वाढती लोकसंख्या हे सगळे लक्षात घेता दैनंदिन जीवनात येणाऱ्या नागरी सुविधांचा देखील अभाव आपल्याला भासत आहे हे निदर्शनास आणून देत याबाबतीत आपले नेक्स्ट व्हिजन असणे गरजेचे आहे अशा आशयाचे प्रतिपादन केले यावेळी विरोधी पक्षनेते भोईर यांनी पर्यावरण शिक्षण आरोग्य या विषयांना हात घालत शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी डेव्हलपमेंट प्लॅन हा अतिशय योग्य व उत्तम रित्या करणे गरजेचे आहे व शहरात आज पाणीपुरवठा नागरिकांना होणारी टंचाई याबाबतीत लक्ष वेधून नेक्स्ट व्हिजन मध्ये आपले प्रतिपादन केले.
यावेळी बीज भाषणामध्ये संचालक जयंत शिंदे यांनी किमया कम्युनिकेशन्स व्यापक उद्देश व शहरासाठी शहराच्या शेवटच्या घटकासाठी त्याच्या उन्नतीसाठी चांगल्या पद्धतीने शहराचे नेक्स्ट व्हिजन असले पाहिजे या संदर्भात उदाहरण देत आपले भाषण केले.उद्घाटक कृष्णकुमार गोयल यांनी अनेक महत्त्वाच्या सूचना देत शहरात योग्य नियोजनानुसार बांधकाम व्हावे व आज पुण्यासारखेच महत्त्व पिंपरी चिंचवड शहराला आले यापुढे त्यापेक्षाही जास्त महत्त्व शहराला येईल आजही लोकांची मागणी ही व्यवसायासाठी राहण्यासाठी पिंपरी चिंचवड शहराला प्रथम आहे असे अधोरेखित केले. अध्यक्ष भाषणात महापौर यांनी प्रतिपादन केलेल्या अनेक विषयांना योग्य पद्धतीने उत्तर देत आगामी काळामध्ये पाणी शिक्षण आरोग्य पर्यावरण स्वच्छता या सगळ्या विषयांसाठी महानगरपालिका तत्परतेने काम करेल व संबंधित तज्ञांची यामध्ये सूचना हरकती लक्षात घेऊन काम करता येईल असे आवर्जून सांगितले यावेळी सॅटर्डे क्लब ची सुरुवात देखील आपण करू असे आश्वासित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री माधव पाटील सूत्रसंचालन गौरव चौधरी व आभार मयूर जयस्वाल यांनी केली या कार्यक्रमाच्या वेळी शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.










































