डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वीकारला पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदाचा पदभार

1 Min Read

दि.१६(पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार डॉ. विजय नामदेव सूर्यवंशी यांनी आज मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून स्वीकारला. यावेळी महापौर रवि लांडगे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह नगरसदस्य संदीप कस्पटे,बाबासाहेब त्रिभुवन,नगरसदस्या आणि अधिकारी,कर्मचाऱ्यांनी देखील डॉ. सूर्यवंशी यांचे स्वागत केले.

यावेळी महापौर रवि लांडगे, मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यात शहरातील विविध विकास प्रकल्प, नागरी सुविधा आणि महापालिकेच्या सुरू असलेल्या कामकाजाबाबत सविस्तर चर्चा झाली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची गती कायम ठेवणे, नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे तसेच प्रशासनाचे कामकाज अधिक प्रभावी आणि गतिमान करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

तसेच नवीन आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. सूर्यवंशी यांनी महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेत शहराच्या विकासासाठी प्रशासनाच्या माध्यमातून समन्वयाने आणि प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Share This Article