मोदी सरकारला दणका; आंध्रप्रदेश,पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’वर बंदी

0
713

कोलकता, दि. १७ (पीसीबी) – केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या सर्वोच्च     स्वतंत्र तपास यंत्रणा ‘सीबीआय’ला  आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंध्रप्रदेशमध्ये बंदी घातली. आता पश्चिम बंगालमध्येदेखील सीबीआयवर बंदी घालण्याचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोदी सरकारला हा फार मोठा दणका बसल्याचे मानले जात आहे.  

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा कित्ता गुरविला आहे. मोदी सरकारमधून बाहेर पडल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी केंद्राला मोठा धक्का दिला आहे. आंध्र प्रदेश सरकारने दिल्ली विशेष पोलीस दलाला दिलेली संमती रद्द केली आहे. त्यानंतर आता पश्चिम बंगाल सरकारनेदेखील सीबीआयवर बंदी घातल्याने पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि राज्य सरकार आमनेसामने आले आहेत.

या बंदीमुळे आता आंध्र प्रदेश किंवा पश्चिम बंगाल राज्यांमध्ये सीबीआयला तपास करायचा असेल तर, त्यांना तेथील राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल. पंतप्रधान मोदींचे केंद्र सरकार केंद्रीय संस्थांचा दुरुपयोग करत राज्यांमध्ये विविध कारवाया करत आहे. त्यामुळे राज्यातील लोकांचा राज्य सरकारवरचा विश्वास कमी होत आहे, असे  विरोधी पक्षांनी म्हटले आहे.