पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर

1 Min Read

दि.०४(पीसीबी)- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सहा वेळा नगरसेवक असलेले जेष्ठ सदस्य भाऊसाहेब सोपानराव भोईर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी नियुक्त करण्यात आले आहे.

१९९२ पासून ते सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. महापालिका विरोधी नेते म्हणूनही त्यांनी यापूर्व काम पाहिले आहे. शहर काँग्रेसचे अध्यक्षपद दोनवेळा त्यांच्याकडे होते. २००९ मध्ये काँग्रेसकडून आणि नंतर २०२४ ला अपक्ष उमेदवार म्हणून चिंचवड विधानसभा त्यांनी लढविली आहे. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पाहिली आहे.

शहरात सांस्कृतिक चळवळ रुजविण्यात भोईर यांचे मोठे योगदान आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेची दोन अधिवेशने त्यांंच्या नेतृत्वाखाली शहरात पार पडली. गेली २९ वर्षे नाट्य परिषदेचे शहराध्यक्ष आहेत. भोईर यांनी शहराच्या विकासासाठी आणि सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.

Share This Article