कोयत्याने वार करत खून करण्याचा प्रयत्न

bpcauthor bpcauthor
1 Min Read

दोघे गंभीर जखमी; तिघांना अटक

आळंदी, दि.10 (पीसीबी)
भांडणाच्या रागातून सहा जणांनी मिळून दोघांवर कोयत्याने वार करत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (दि. ८) सायंकाळी सात वाजता आळंदी येथे घडली. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

नागेश बालाजी कांबळे (वय १९, रा. कुरुळी, ता. खेड), आदित्य तुकाराम सातपुते (वय २२), विश्वजित दामोदर कदम (वय २०, दोघे रा. आळंदी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह महेश पितळे आणि इतर दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल दौलत गुट्टे (वय २४, रा. आळंदी), बालाजी लिंबोळे अशी जखमींची नावे आहेत. विठ्ठल गुट्टे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ डिसेंबर रोजी रात्री फिर्यादी विठ्ठल गुट्टे आणि आरोपींची भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरून आरोपींनी ८ डिसेंबर रोजी सायंकाळी पुन्हा विठ्ठल गुट्टे आणि त्यांचे मेहुणे बालाजी लिंबोळे यांना अडवले. तुला आता जिवंत ठेवत नाही, असे म्हणत आरोपींनी विठ्ठल यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये विठ्ठल हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर विठ्ठल यांचे मेहुणे बालाजी यांच्यावर देखील आरोपींनी कोयत्याने वार केले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article