उपसरपंच विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण करुन हत्या

0
3

पुणे, दि. १७ (पीसीबी) – निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच एका उपसरपंच ची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या केल्याचे उगड झाले आहे.

पुणे जिल्ह्यातील सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावचे माजी उपसरपंच आणि कंत्राटदार विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, जबलपूरहून एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संशयिताने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांना खडकवासला धरणाच्या बॅक वॉटरमधील ओसाडे गावाच्या हद्दीत एका मृतदेहाचे तुकडे आढळून आले आहेत. तो विठ्ठल पोळेकर यांचाच आहे का याची अद्याप खात्री पटलेली नसल्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावचे माजी उपसरपंच आणि कंत्राटदार विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. गुरुवारी पहाटे सहा वाजता मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण करण्यात आले होते.

या भागातील कुख्यात गुंड बाबू मामे याने अपहरण केल्याची तक्रार पोळेकर यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे दिली होती. त्यानंतर आज विठ्ठल पोळेकर यांच्या मृतदेहाचे तुकडे खडकवासला धरणाच्या पाण्यात ओसाडे गावच्या हद्दीत आढळून आले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

बाबू मामे याने काही दिवसांपूर्वी विठ्ठल पोळेकर यांच्या पुण्यातील कार्यालयात जाऊन जग्वार कार किंवा दोन कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली होती. त्यामुळे कुख्यात गुंड बाबू मामे याने अपहरण केल्याची तक्रार पोळेकर यांच्या कुटुंबीयांनी पोलीसांकडे दिली होती. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.