लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचा छळ; तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

bpcauthor bpcauthor
1 Min Read

हिंजवडी, दि. 17 (पीसीबी) : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने तरुणीचा छळ केला. तसेच तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. या छळला कंटाळून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 25 सप्टेंबर रोजी बावधन येथे घडली.

डॉ शंतनु शरद चोप्रा (वय 30, रा. संगमवाडी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या तरुणीच्या आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चोप्रा याने फिर्यादी यांच्या मुलीला लग्न करण्याचे वचन दिले. त्यानंतर तिला वारंवार मानसिक त्रास दिला. 23 सप्टेंबर रोजी त्याने फिर्यादी यांच्या मुलीला त्याच्यासोबत राहण्यासाठी बोलावले. त्यानंतर तिच्याशी भांडण करून मध्यरात्री बारा वाजता तिला घराबाहेर काढले. तरुणीने आरोपीच्या हाता पाया पडून एवढ्या रात्री कुठे जाऊ असे विचारले. त्यावर त्याने कुठेही जाऊन मर. जीव दे. मला नको सांगू, असे म्हटले. या छळाला कंटाळून फिर्यादी यांच्या मुलीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article