पिकपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

bpcauthor bpcauthor
1 Min Read

चाकण, दि. 14 (पीसीबी) : भरधाव पिकअपने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 13) सकाळी आठ वाजताच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर बिरदवडी फाटा येथे घडली.

मनोज सैनी (वय 28, रा. वाकी, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी ओंकार बाजीराव कुलाळ (वय 20, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिकअप (एमएच 01/बीएस 0260) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज हे त्यांच्या दुचाकीवरून पुणे नाशिक महामार्गावरून जात होते. बिरदवडी फाटा येथून बिरदवडीकडे जात असताना भरधाव पिकअपने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात मनोज यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर पिकअप चालक पिकअप घटनास्थळी सोडून पळून गेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article