मी पुण्याची लोकल, मित्रांबरोबर पबला जा… ; मित्राच्या पत्नीला धमकावणारी महिला पोलीस निलंबित

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पुणे : पुण्यातून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. ‘मी पुण्याची लोकल आहे. माझी गुंडांबरोबर ओळख आहे,’ अशी धमकी देत मित्राच्या पत्नीला शॉर्ट ड्रेस घालण्यासह, ‘तुझ्या मित्रांबरोबर पबला जा,’ असे सांगून तसे नाही केले तर जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी शहरातील एका महिला पोलिस शिपायाला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. याबाबातचे आदेश पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिले आहेत. अनघा सुनील ढवळे असं निलंबित केलेल्या महिला पोलिसाचे नाव आहे. ढवळे यांच्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पुण्यातील कोथरूड वाहतूक विभागात ढवळे यांची नेमणूक होती. मात्र, दोन महिन्यांपूर्वी ढवळे यांच्यावर गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत ३१ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.‘मी पुण्याची लोकल आहे. माझी गुंडांबरोबर ओळख आहे. तसेच आम्ही एक सामाजिक सोशल फाउंडेशन चालवतो. या फाउंडेशनच्या माध्यमातून ब्लॅकचे व्हाइट मनी करतो. त्यामध्ये आमचा एक ९ कोटींचा व्यवहार झाला आहे.

त्यामध्ये तुझ्या नवऱ्याला ४० ते ५० लाख रुपये मिळणार आहेत. ‘मी सांगेल तशी वागली नाही तर तुला ठार मारू’, अशी धमकी ढवळने महिलेला दिली होती. याप्रकरणी ढवळेविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर तिची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमाेल झेंडे यांनी तिला पोलीस सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

Share This Article