बुलेटच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या महिलेचा मृत्यू

bpcauthor bpcauthor
1 Min Read

भोसरी, दि. ११ (पीसीबी)

पायी रस्ता ओलांडत असलेल्या महिलेला भरधाव बुलेटने धडक दिली. त्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात 25 ऑगस्ट रोजी दुपारी कासारवाडी येथे घडला.

मुन्नी बेगम वकील अहमद (वय 44) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वकील अहमद हजरत अली (वय 49, रा. कासारवाडी. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बुलेट (एमएच 12/व्हीके 9589) चालक विद्याधर चंद्रकांत बारटक्के (वय 28, रा. संगमवाडी, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्नी मुन्नी बेगम वकील अहमद या कासारवाडी येथे यामाहा शोरूम समोर पायी रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी भरधाव आलेल्या बुलेटने त्यांना धडक दिली. त्यामध्ये त्यांच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article