गांजा विक्री प्रकरणी तरुणास अटक

bpcauthor bpcauthor
1 Min Read

हिंजवडी,दि. ११ (पीसीबी)

गांजा विक्री प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून 514 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 10) दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास सुसगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिंजवडी येथे करण्यात आली.

राहुल रणजीत शिंदे (वय 28, रा. सुसगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अरुण नरळे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल शिंदे यांनी त्याच्या कब्जात 51 हजार 430 रुपये किमतीचा 514 ग्रॅम वजनाचा गांजा बाळगला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी कारवाई करत त्याच्याकडून तो गांजा जप्त केला. गांजासह पाच हजारांचा मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article