उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपघात ग्रस्त व्यक्तीला दिला मदतीचा हात.

0
68

स्वतःच्या ताफ्यातील डॉक्टरला अपघात ग्रस्त व्यक्तीचा उपचार करण्याच्या दिल्या सूचना..!

पुणे १० (पीसीबी) – उपमुख्यमंत्री श्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर असताना. सर्किट हाऊस कडे आपल्या शासकीय वाहनाने जात असताना. संचेती हॉस्पिटलच्या पुलाखाली एका दुचाकी स्वराचा व रिक्षाचा अपघात झाला. अजित दादा यांनी त्वरित आपला ताफा थांबवत अपघात ग्रस्त व्यक्तीला धीर दिला व त्याची विचारपूस करत त्याच्याशी संवाद साधला तसेच अपघातग्रस्त यांच्या वर त्यांच्या ताफ्यातील अँब्युलन्स मधील डॉक्टर यांना ताबडतोब उपचार करण्या साठी सांगितले. व आपल्या पुढील कामासाठी अजितदादा रवाना झाले.