आधार कार्डमुळे मोबाईल फोन नंबर बंद होणार नाही – यूआयडीएआय

0
649

नवी दिल्ली , दि. १८ (पीसीबी) –  आधार कार्डमुळे मोबाईल फोन नंबर बंद होणार नाही, अशी ग्वाही   टेलीकॉम विभाग आणि युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने दिली आहे. टेलीकॉम विभाग आणि आधारने याबाबत आज (गुरूवार) संयुक्त निवेदन प्रसिध्द केले आहे.

आधार क्रमांक व्हेरिफेकेशनच्या आधारावर जारी केलेले सिम कार्ड जर नव्या व्हेरिफिकेशनमध्ये फेल ठरले, तर हे सिम कार्ड डिसकनेक्ट केले जाऊ शकतात. यामुळे मोबाईल फोन वापरणाऱ्या देशभरातील ५० कोटी युझरचे फोन बंद होऊ शकतात, असे वृत्त आले होते. मात्र, हे वृत्त काल्पनिक आणि चुकीचे असल्याचे यूआयडीएआय, आधार प्राधिकरणाने म्हटले आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता की, खासगी कंपन्या व्हेरिफिकेशनसाठी आधार क्रमांकाचा वापर करु शकत नाहीत. फोन कनेक्शन किंवा बँक खाती आता आधारशी लिंक करणे गरजेचे नाही. खासगी कंपन्या युझरकडून याची मागणीही करु शकत नाहीत. या मुद्द्यावर सरकारमध्ये उच्च स्तरावर विचारविनिमय सुरु आहे. कारण जर मोठ्या संख्येने मोबाईल नंबर डिसकनेक्ट केले तर नागरिकांवर त्याचा मोठा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे सरकार नव्या केवायसीसाठी युझरना आवश्यक वेळ देणार आहे.