मोशीतील यशस्वी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

0
595

भोसरी, दि. १५ (पीसीबी) – भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त मोशीतील यशस्वी प्राथमिक विद्यालय व माध्यमिक विद्यालय इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आज (सोमवारी) वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुभाष देवकाते, मुख्याध्यापिका शोभा देवकाते, डॉ. तुषार देवकाते आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुभाष देवकाते यांनी विद्यार्थ्यांना अब्दुल कलाम यांच्याविषयी माहिती दिली. तर मुख्याध्यापिका शोभा यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व पटवून दिले.