…तर काँग्रेससोबत हातमिळवणी करण्यास तयार- कमल हसन

0
664

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – काँग्रेसने द्रमुकसोबतची युती तोडल्यास आपण २०१९ च्या लोकसभा निवडणूकांसाठी काँग्रेससोबत हातमिळवणी करण्यास तयार आहोत, असे महत्त्वपूर्ण विधान दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन यांनी केले आहे. काँग्रेससोबत युती केल्यास तामिळनाडूतील जनतेला विकासाच्यादृष्टीने निश्चितच फायदा होईल, असेही ते यावेळी म्हणाले.