रासे गावात दारू भट्टीवर चाकण पोलिसांचा छापा

bpcauthor bpcauthor
1 Min Read

खेड, दि. २५ (पीसीबी) – खेड तालुक्यातील रासे गावात चाकण पोलिसांनी दारूभट्टीवर छापा मारला. यामध्ये पोलिसांनी 40 हजारांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 24) रात्री करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस अंमलदार पवन आहेरकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने रासे गावात डोंगरा जवळ गावठी दारू तयार करण्यासाठी भट्टी लावली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर चाकण पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. या कारवाईमध्ये 40 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article