संत निरंकारी मिशनद्वारा भोसरी येथे विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन

bpcauthor bpcauthor
1 Min Read

निरंकारी मिशनचे स्वयंसेवक करत आहेत घराघरामध्ये रक्तदानाची जनजागृती

भोसरी, मुंबई, दि. २१ (पीसीबी) – सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील भोसरी ब्रांच येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन संत निरंकारी सत्संग भवन, भोसरी या ठिकाणी रविवार दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत करण्यात आले आहे. मिशनचे स्वयंसेवक भोसरी आणि दिघी परिसरात घराघरामध्ये जाऊन तसेच दत्तगड पायथा,मॅगझीन चौक, भोसरी चौक, स्पाईन सर्कल अशा अनेक गर्दीच्या ठिकाणी जाऊन नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करत आहेत.

संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी,नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. आपण मानव आहोत तर रक्तदान करणे हे आपले मानवीय कर्तव्य आहे. रक्तदानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण दुसऱ्या व्यक्तीशी रक्ताचे नाते जोडू शकतो. ‘रक्तदान श्रेष्ठदान’ या उक्तीप्रमाणे आपण सर्वानी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन भोसरी चे संयोजक अंगद जाधव यांनी केले आहे.

Share This Article