कै.मनीषा भोईर यांच्या १४ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त महिला बचत गटांचा सन्मान

0
224

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – कै.मनीषा भोईर यांच्या १४ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कै.मनीषा भाऊसाहेब भोईर ट्रस्टच्या वतीने पाच वर्षे व दहा वर्षे पूर्ण झालेल्या प्रेमलोक पार्क, इंदिरा नगर, बिजलीनगर, भोईर नगर आणि दळवीनगर मधील महिला बचतगटांचा सत्कार समारंभ शुक्रवार दिनांक १५/१२/२०२३ रोजी सकाळी ११ वा मनीषा स्मृती निवास, भोईर नगर चिंचवड येथे संपन्न झाला. यावेळी महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक सौ. किरण हर्षवर्धन भोईर यांनी केले यावेळी स्थानिक उल्लेखनीय कार्य महिला बचतगट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पिंपरी चिंचवड महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या अध्यक्ष कविता अल्हाट यांच्या हस्ते परिसरातील नविन महिला बचत गटांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी कविता अल्हाट यांनी महिला बचत गटांनी व्यवसायात कसे उतरावे व त्याचा प्रसार कसा करावा व त्याचा प्रसार कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले तसेच भविष्यात त्याची उपलब्धता कशी आहे हे सांगितले. मा. वैशालीताई काळभोर या आपल्या भाषणात  कै. मनिषा भाऊसाहेब भोईर यांच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाल्या, प्रभागातील महिलांच्या मदतीसाठी मनिषा भोईर नेहमी तत्पर असत, त्याप्रमाणे किरण भोईर या कार्यतत्पर असतात.  त्यांच्याच पाऊलावर पाउल ठेऊन आज सौ. किरण भोईर खंबीरपणे या सर्व बचत गटांच्या मागे उभ्या आहेत. त्या वेळोवेळी महिलांसाठी आरोग्य शिबीर व इतर उप्रकम राबवीत असतात ज्यामधून महिलांना व्यवसायिक व आर्थिक समृद्धी मिळते. तसेच समाजात वावरतांना त्यांना योग्य दिशा मिळते.  किरण भोईर यांनी आपल्या भाषणात बचत गट आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रकाश टाकला. एक महिला स्वयंस्फूर्तीने महिला बचत गटामार्फत कितपत काम करू शकते याबाबत तसेच महिला बचत गटाने सतत कृतीशील रहावे असे प्रतिपादन केले.

यावेळी महासंघाच्या वतीने प्रभागातील १० वर्षे पूर्ण केलेल्या कृतीशील महिला बचत गटांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.तसेच काही नवीन महिला बचत गटांचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. निलम शिंदे यांनी केले. यावेळी मा. गीतल गोलांडे, सुप्रिया भिंगारे, अनिता गायकवाड तसेच प्रभागातील महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या.