पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

1 Min Read

रावेत, दि. १ (पीसीबी) – पिस्टल बाळगल्या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 29) सायंकाळी वाल्हेकरवाडी – रावेत रस्त्यावर करण्यात आली.

अभिजित भारत शिंदे (वय 22, रा. चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार पंकज भदाणे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी-रावेत रस्त्यावर एकजण पिस्टल घेऊन आला असल्याची माहिती चिंचवड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वाल्हेकरवाडी-रावेत रस्त्यावर सापळा लाऊन अभिजित शिंदे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 15 हजार रुपये किमतीची एक पिस्टल आणि 600 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस आढळून आले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article