मध्य प्रदेश, मिझोराममध्ये २८ नोव्हेंबरला; तर राजस्थान, तेलंगणामध्ये ७ डिसेंबरला विधानसभेसाठी मतदान

0
439

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – पाच राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (शनिवार) पत्रकार परिषदेत जाहीर केल्या. देशातील मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि मिझोराम, तेलंगणा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पाचही राज्यांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ११ डिसेंबरला पाचही राज्यांची मतमोजणी आणि निकाल जाहीर  करण्यात येणार आहे.

याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी माहिती दिली. मध्य प्रदेश आणि मिझोराममध्ये २८ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर राजस्थान आणि तेलंगणामध्ये ७ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे.  या सर्व निवडणुकांचा निकाल ११ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे.छत्तीसगढमध्ये पहिल्या टप्प्यातील विधानसभा निवडणुक १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुक २० नोव्हेंबर रोजी होणार आहे.