गहुंजे येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीची पत्नीला बेदम मारहाण

0
592

भोसरी, दि. ६ (पीसीबी) – पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून पतीने घरगुती कारणावरून पत्नीला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला. हा प्रकार शुक्रवारी (दि. ५) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गहुंजे गावातील गजानन सोसायटीमध्ये घडला.

या प्रकरणी सुनंदा राहूल चव्हाण (वय ५४, रा. गजानन सोसायटी, गहुंजे) यांनी तळेगाव ताभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती राहूल किसन चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनंदा आणि राहूल हे दाम्पत्य गहुंजे गावातील गजानन सोसायटीत राहतात. पती राहूल पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. काल (शुक्रवारी) घरातील प्रापंचिक कारणावरून दोघांमध्ये वाद झाले. यावरून पतीने पत्नीला शिवीगाळ आणि दमदाटी करत बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा मणका फॅक्चर झाला. तळेगाव ताभाडे पोलिस तपास करत आहेत.