घरासमोरून दुचाकी चोरीला

PCB Admin
1 Min Read

चाकण, दि. १७ (पीसीबी) – घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. १६) सकाळी साडेसात वाजता राक्षेवाडी, काळूस रोड, चाकण येथे उघडकीस आली.

हितेश युवराज बोरसे (वय २४, रा. राक्षेवाडी, काळूस रोड, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची २० हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १९/सीबी ४७२८) त्यांच्या घरासमोर पार्क केली. रात्रीच्या वेळी दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article