पार्किंग मधून दुचाकी चोरीला

bpcauthor bpcauthor
1 Min Read

महाळुंगे, दि. २० (पीसीबी) – घराच्या पार्किंग मध्ये पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 19) सकाळी महाळुंगे येथे उघडकीस आली.

रामजी सुगिया साकेत (वय 30, रा. महाळुंगे, ता. खेड) यांनी याप्रकरणी महाळुंगे पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 70 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 10 / बी क्यू 7801) त्यांच्या घरासमोर पार्क केली होती. रात्रीच्या वेळी चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article