पिंपरीत पावणेतीन लाखांची घरफोडी

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – बनावट चावीच्या सहाय्याने कपाट उघडून चोरट्याने घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा पावणेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला ही घटना मंगळवारी (दि. 30) रात्री पिंपरी येथे उघडकीस आली.याप्रकरणी महिलेने अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरातून 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या कालावधीत अज्ञात चोरट्याने बनावट चावीच्या सहाय्याने कपाट उघडले. कपाटातून एक लाख 96 हजार रुपये किमतीचे 49 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 80 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण दोन लाख 76 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article