मका खरेदीत व्यापाऱ्याची 14 लाखांची फसवणूक

1 Min Read

निगडी, दि. १ (पीसीबी) – व्यापाऱ्याकडून मका खरेदी करून खरेदी केलेल्या मक्याचे 14 लाख 57 हजार रुपये न देता फसवणूक केली. हा प्रकार नऊ नोव्हेंबर 2021 ते 15 डिसेंबर 2021 या कालावधीत छिंदवाडा मध्य प्रदेश आणि घोजादंगा पश्चिम बंगाल येथे घडला.

दिलीप दशरथ राजीवडे (वय 49. रा. यमुनानगर निगडी) यांनी या प्रकरणी मंगळवारी (दि. 30) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक घोष (रा. बांगलादेश), रणजीत सिंग उर्फ अखिलेश मौर्य (रा. पश्चिम बंगाल) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शेती उत्पादनांचे आयात निर्यात करतात. आरोपींनी ऑनलाइन माध्यमातून फिर्यादी यांच्याकडून 14 लाख 57 हजार रुपये किमतीची मका घेतली. घेतलेल्या मक्याचे आरोपींनी पैसे न देता फिर्यादींची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article