स्वयंपाकाच्या कारणावरून सुनेने केला सासूचा गळा आवळून खून..

0
487

चाकण, दि. १६ (पीसीबी) – स्वयंपाक बनवण्याच्या कारणावरून सुनेने ७१ वर्षीय सासूचा नायलॉन दोरीने गळा आवळून खून केला आहे. ही घटना चाकण येथे घडली असून पोलिसांनी सुनेला बेड्या ठोकल्या आहेत. सुषमा अशोक मुळे वय- ७१ अस खून करण्यात आलेल्या सासूचे नाव असून सुवर्णा सागर मुळे वय- ३२ अस अटक करण्यात आलेल्या सुनेचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सासू सुषमा, आरोपी सून सुवर्णा आणि पती हे एकत्र राहतात.

मयत सासू सुषमा आणि सून सुवर्णा यांच्यात नेहमी भांडण व्हायचं. सुवर्णा हिला तीन वर्षांचा मुलगा आहे. तो, सासू सुषमा यांच्याकडे सोडून शेजारी गप्पा मारत बसायची. यावरून ही सासू सुनात अनेकदा वाद झाले. सुषमा यांना फिट, शुगर आणि बीपी चा आजार होता. सुवर्णा चा पती कामावर गेल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा स्वयंपाक बनवण्यावरून दोघींमध्ये वाद झाला. त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. तेव्हाच, सुवर्णा ने नायलॉन दोरी घेऊन सासू चा गळा आवळला.
स्वयंपाक बनवण्याच्या कारणावरून सुनेने ७१ वर्षीय सासूचा नायलॉन दोरीने गळा आवळून खून केला आहे. ही घटना चाकण येथे घडली असून पोलिसांनी सुनेला बेड्या ठोकल्या आहेत. सुषमा अशोक मुळे वय- ७१ अस खून करण्यात आलेल्या सासूचे नाव असून सुवर्णा सागर मुळे वय- ३२ अस अटक करण्यात आलेल्या सुनेचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सासू सुषमा, आरोपी सून सुवर्णा आणि पती हे एकत्र राहतात.