रिक्षाचालकांचा अंतसंपला आता बोंबाबोंब आंदोलन:- बाबा कांबळे

0
234

पिंपरी,दि.२१(पीसीबी) – गेली सात महिने रिक्षा व्यवसाय बंद आहे रिक्षा चालक अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे आर्थिक व्यवस्थेला कंटाळून महाराष्ट्रात आठ रिक्षाचालकांनी आत्महत्या केली आहे‌.

उद्योगपती सह सर्वांना 20 लाख कोटीचे पॅकेज जाहीर करण्यात आले परंतु रिक्षाचालकांना मदत मात्र केले नाही, दिल्ली आणि कर्नाटक सरकारने रिक्षाचालकांना आर्थिक मदत केली,

परंतु महाराष्ट्र सरकारने मात्र आत्तापर्यंत रिक्षाचालकांना मदत केली नाही.

याबाबत महाराष्ट्रातील वीस लाख रिक्षाचालक मालकांच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारला वेळोवेळी निवेदन दिले आहेत परंतू दखल न घेतल्यामुळे ,
आत्ता मात्र अंतसंपला आता बोंबाबोंब आंदोलन करणार असे महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी सांगितले पिंपरी चिंचवड मधील रिक्षाचालकांच्या बैठकीत ते बोलत होते ,महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने पिंपरी येथे १९-९-२०२० रोजी रिक्षा स्टँड प्रमुखाचे बैठक बोलवण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते
यावेळी रिपब्लिकन युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डबाळे, बाळासाहेब ढवळे,संजय गरड ,संजय कदम ,मनोहर टोणपे ,संदीप सांगावे, प्रदीप सांगवे, संतोष धुमाळ ,मुकेश कुचेकर, भूषण गायकवाड ,आनंद गायकवाड ,लक्ष्मण जगधने, विलास जोगदंड ,लक्ष्मण घोडके, विजय ढगारे ,तुषार लोंढे, बाबासाहेब सरोदे ,संजय गजरे संजय दौंड ,असेर वस्ताद, तय्यब आत्तर ,विशाल कांबळे ,राहुल कांबळेे ,आकाश परदेशी, अनिल जेऊरकर ,दत्ता उलटे ,आनंद गायकवाड ,दादा साहेब इथापे, अंगद मुगले, संतोष पवार ,गालिब तांबोळी ,अनिल नंदेपगोळ, विलास उमाप, संतोष पवार, धनंजय कुदळे, सागर पवळे, निलेश वाघुले ‘संतोष मस्के.
आदी उपस्थित होते

३०-सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पिंपरी चिंचवड पुणे आणि महाराष्ट्रातील सर्व आटो रिक्षा स्टँडवर रिक्षाचालक एकत्र येऊन सरकारच्या विरोधामध्ये तीवर आक्रोश करून बोंबाबोंब आंदोलन करणार आहेत

यावेळी बाबा कांबळे म्हणाले महाराष्ट्र मध्ये आठ रिक्षाचालकांनी आत्महत्या केले आहेत अनेक रिक्षाचालक आर्थिक परिस्थितीमुळे हैराण झाले असून आत्महत्या करण्याच्या मार्गावर आहे सरकार मात्र सुशांत आत्महत्या प्रकरणांमध्ये लक्ष देते परंतु ८ रिक्षाचालकांची आत्महत्या झाल्या तरी सरकारने या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाहीये यामुळे

” रिक्षाचालकांचे संपूर्ण कर्ज माफ करावं रिक्षाचालकांना फायनान्स कडुन होणारा त्रास ताबडतोब थांबवावा या साठी योगे ते आदेश सरकारने संबंधित फायनान्स कंपनी आणि बँकांना द्याव्यात,
रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावं ,
मुक्त रिक्षा परवाना बंद करावा ,
ओला उबेर वरती निर्बंध आणावेत रिक्षाचालकांना सार्वजनिक सेवेचा दर्जा द्यावा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन होणार असून महाराष्ट्रातील सर्व रिक्षा चालक मालकांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन हे आंदोलन अधिक तीव्र करावं असे आव्हान या वेळी बाबा कांबळे यांनी केले आहे,

यावेळी राहुल डंबाळे म्हणाले महाराष्ट्र मध्ये रिक्षा चालकांच्या आत्महत्या होणे ही अत्यंत गंभीर बाब असून यासाठी कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी सुरू केलेल्या आंदोलनास जाहीर पाठिंबा असून महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन युवा मोर्चाचे कार्यकर्ते देखील आंदोलनामध्ये सहभागी होतील या बरोबरच या आंदोलनामध्ये प्रवाशांनी देखील पाठिंबा देऊन प्रवाशांनी देखील या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.