लिव्ह एन रिलेशशिप मधून जन्मलेल्या मृत बाळाला रस्त्यावर फेकले

0
832
  • खराडी येथील आयटी कंपनीतील जोडप्याचे काळीमा फासणारे कृत्य

पिंपरी, दि.२५ (पीसीबी) – लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये विश्रांकवाडी (पुणे) येथे एकत्र राहणाऱ्या आयटी कंपनीतील जोडप्याने माणुसकिला काळीमा फासणारे कृत्य केले. जन्माला आलेल्या नवजात अर्भकाला मृत होताच रस्त्याच्या कडेला टाकून पळ काढला. पोलिसांनी बारा तासात त्यांचा शोध घेऊन गुन्हा दाखल केला.

विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोहगाव वाघोली रस्त्यावरील खराडी आयटी पार्क मध्ये एका कंपनीत हे जोडपे काम करते. लिव्ह इन रिलेशनमध्ये ते एकत्र राहत होते. त्यातून ती तरुणी गरोदर राहिली. अडिच महिन्यापुर्वी या तरुणीने येरवड्यातील सरकारी रुग्णालयात मुलाला जन्म दिला. तिचे बाळंतपण झाल्यानंतर त्यांनी मुलाचे संगोपन सुरू केले, पण बुधवारी (दि.२२) ते बाळ दगावले. घाबरलेल्या या जोडप्याने त्या बाळाच्या मृतदेहावर रितसर अंत्यसंस्कार न करताच लोहगाव स्मशानभूमी रस्त्यालगत दुपारी एक च्या सुमारास शव फेकून दिले.

लोहगाव पोलिस ठाण्याचे निरिक्षक ए.जे. मुजावर हे कोरोनाच्या बंदोबस्तावर असताना त्यांना मृत बाळाला फेकून दिल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन बाळाचे शव ससून मध्ये पाठविले. पाठोपाठ सरकारी व खासगी रुग्णावयांतून माहिती घेणे सुरू केले. सरकारी रुग्णालयात जन्म देणाऱ्या महिलांचा शोध सुरू केला असता हा गुन्हा उघड झाला. मुळचे नाशिकचे असणाऱ्या जोडप्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपास सुरू आहे.