पुणे विभागात कोरोना बाधित १०८५ रुग्ण – डॉ.दीपक म्हैसेकर

0
513

 

पुणे, दि.२५ (पीसीबी) – विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १०८५ झाली असून विभागात १८१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण ८३१ आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण ७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३८ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

विभागात १०८५ बाधित रुग्ण असून ७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात ९८५ बाधीत रुग्ण असून ६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात २१ बाधीत रुग्ण असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात ४१ बाधीत रुग्ण असून ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात २८ बाधीत रुग्ण असून १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात १० बाधीत रुग्ण आहेत.

आजपर्यंत विभागामध्ये एकूण १२ हजार ७५५ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी १२ हजार ८६ चा अहवाल प्राप्त आहे. ६६९ नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी १० हजार ९३९ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून १ हजार ८५ चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.