चाकू हल्‍ल्‍यात मित्रानेच केला मित्राचा खून

1 Min Read

दि.१३(पीसीबी)-किरकोळ कारणावरून झालेल्या वादात मित्राने तरुणावर चाकूने वार करून त्याचा खून करण्‍यात आला. ही घटना बुधवारी (११ फेब्रुवारी) रोजी रात्री पावणे दहा वाजताच्‍या सुमारास खेड तालुक्‍यातील नाणेकरवाडी येथे घडली. जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

किशोर सुरेश राणे (२५) असे खून झालेल्‍या तरुणाचे नाव आहे. कपिल जितेंद्र कोसलकर (नाणेकरवाडी, ता. खेड, जि. पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. योगेश दत्तात्रेय नाणेकर (३०, नाणेकरवाडी, ता. खेड) यांनी दक्षिण चाकण पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याचा मित्र किशोर राणे याच्यावर धारदार चाकूने छातीवर व बरगड्यांवर वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला आस्था हॉस्पिटल, चाकण येथे दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. चाकण दक्षिण पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article