खंडणी प्रकरणात कुख्यात आंदेकर टोळीवर गुन्हा, शिवम आंदेकर पोलिसांच्या ताब्यात

1 Min Read

दि . ७ ( पीसीबी ) – शहराच्या मध्यवस्तीतील नाना पेठेतील मच्छी मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या एका मासेविक्रेत्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात आंदेकर टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी टोळीचा प्रमुख शिवम आंदेकरला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार ३८ वर्षीय मासेविक्रेत्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा मासे विक्रीचा स्टॉल नाना पेठेतील मच्छी मार्केट परिसरात आहे. शिवम आंदेकर आणि त्याचे साथीदार गेल्या तीन महिन्यांपासून त्याच्याकडे दरमहा ५० हजार रुपये खंडणी मागत होते. पैसे न दिल्यास स्टॉल बंद पाडण्याची आणि जीवे मारण्याची धमकीही दिली गेली होती. असे तक्रारदाराने म्हटलं आहे.

याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी शिवम आंदेकरसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शिवम आंदेकरला ताब्यात घेतले असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

९० हजाराचे सामान आंदेकर टोळीने फेकुन दिले

अर्थिक अडचणीमुळं हप्ता देण्यास नकार दिल्यानंतर आदेंकर टोळीने मासे विक्रेत्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच मासे व्यवसायाच्या सामानांचे नुकसान केले. ९० हजार किंमतीचे सामाना या टोळीने फेकुन दिले. सदरचे सामान परत घेण्याासठी तक्रारदार गेले असता त्याना ते न देत टोळीने ते सामान जबरदस्तीने टेम्पोमध्ये घालून घेऊन निघून गेले. त्यानंतर सामान परत करण्याची विनंती केली असता तक्रारदार सह त्याच्या पत्नीचा अपमाना केला आणि हाकलून लावले. असं तक्रादाराने म्हटलं आहे

Share This Article