वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांच्या रांगेत आता देवाभाऊ, सलग तीन वेळा मुख्यमंत्रीपदी

bpcauthor bpcauthor
2 Min Read

मुंबई, दि. 04 (पीसीबी) : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत २० जणांनी मुख्यमंत्रीपद भूषविले असले तरी देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यातील सात जणांना एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे. सर्वाधिक चार वेळा मुख्यमंत्रीपद शरद पवारांनी भूषविले आहे. वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांच्या नंतर देवेंद्र फडणवीस यांना सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याता मान मिळतो आहे.

भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याने आता ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. पहिल्यांदा २०१४ ते २०१९ या काळात पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषविले होते. २०१९ मध्ये गाजलेल्या पहाटेच्या शपथविधीनंतर फडणवीस यांनी अवघ्या साडे तीन दिवसानंरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तिसऱ्या खेपेला त्यांचा गुरुवारी शपथविधी पार पडत आहे.

राज्याच्या इतिहासात वसंतराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस या दोनच मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षांचा सलग कालावधी पूर्ण केला. उर्वरित १८ जणांना पाच वर्षांचा सलग कालावधी मिळालेला नाही. वसंतराव नाईक यांनी १९६३ ते १९७५ असे सर्वाधिक ११ वर्षांपेक्षा अधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविले. शरद पवार यांनी सर्वाधिक चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषविले असले तरी त्यांचा पूर्ण कालावधी हा साडेपाच वर्षांचा आहे. सर्वात कमी साडे तीन दिवस मुख्यमंत्रीपद हे फडणवीस यांनी भूषविले आहे.

एकापेक्षा जास्त काळ मुख्यमंत्रीपद भूषविणारे नेते :
शरद पवार (४ वेळा़)

वसंतराव नाईक ( ३ वेळा)

वसंतदादा पाटील (३ वेळा)

शकंरराव चव्हाण (२ वेळा)

अशोक चव्हाण (२ वेळा)

विलासराव देशमुख (२ वेळा)

देवेंद्र फडणवीस (आता तिसऱ्यांदा)

Share This Article