वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी चिंचवड मतदारसंघात पोलीस स्टेशन हद्दी परिसरात नाकाबंदी व पेट्रोलिंग गस्त वाढवा – नाना काटे

PCB Admin
2 Min Read

चिंचवड, दि. 28 (पीसीबी) : चिंचवड मतदार संघातील वाकड, पिंपळे सौदागर थेरगाव, पिंपळे निलख, सांगवी विविध परिसरात पोलीस ठाणे हद्दीतील परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दागिने, मोबईल हिसकावणे, पाकीट मारणे, घरफोडी, चोरीच्या व इतर घटनामध्ये मोठ्या प्रमाणत वाढ झाली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांगावी पोलीस स्टेशन यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी निवेदन देऊन सांगवी पोलीस स्टेशन अंतर्गत उपनगरात परिसरात नाकाबंदी व पेट्रोलिंग गस्त वाढवा, अशी मागणी केली आहे.

निवेदनात नाना काटे यांनी म्हटले आहे की, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर घटना घडत आहेत, मा. निरीक्षक साहेब या परिसरात मोठ्या प्रमाणत उच्चभृ मोठ्या सोसायट्या आहेत, त्यातील नागरिक वॉकिंग, खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणत येत असतात त्यांना व तसेच इथे छोटे मोठे हॉटेल व इतर व्यवसाय असून, रात्री त्यातील कामगार, मालक घरी परतत असताना त्यांना या चोरट्यांकडून धारदार हत्यार किवा बंदुकीच्या धाकाने त्यांच्या कडील मोबईल, पर्स, दागिने व बाकीचे ऐवज लुटले जातात.

गुन्हेगारी वाढल्यामुळे येथील नागरिकांच्या मध्ये याबाबत दहशत व भीतीचे वातावरण निर्माण होत असून ही खूप गंभीर बाब आहे तरी मा. निरीक्षक साहेब आपण वर नमूद घटनेस गांभीर्याने बघून योग्य त्या उपय योजना कराव्यात तसेच आपल्या पोलीस ठाणे हद्दी परिसरात नाकाबंदी व पेट्रोलिंग गस्त वाढविण्यात यावी व या चोरीच्या घटनेवर नियंत्रण आणावे. अशी विनंती नाना काटे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना केली आहे.

Share This Article