सुदुंबरे येथे दारूभट्टीवर छापा

1 Min Read

तळेगाव, दि. १५ (प्रतिनिधी)

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुदूंबरे येथे सुरू असलेल्या दारू भट्टीवर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने छापा मारला. यामध्ये एक लाख रुपये किमतीचे रसायन नष्ट करण्यात आले आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. १४) दुपारी करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस अंमलदार धनंजय भोसले यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ५६ वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदूंबरे गावात सुधा नदीच्या काठावर दारूभट्टी सुरू असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट पाचला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दारू भट्टीवर छापा मारून कारवाई केली. या कारवाई मध्ये एक लाख रुपये किमतीचे दोन हजार लिटर गुळ मिश्रित रसायन नष्ट करण्यात आले. पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी महिला पळून गेली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article