गांजा विक्री प्रकरणी एकास अटक

PCB Admin
1 Min Read

भोसरी, दि. 4 (पीसीबी)

गांजा विक्रीसाठी आलेल्या एका व्यक्तीला भोसरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक लाख 83 हजार 700 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 2) रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास यमुनानगर, लांडगे वस्ती, भोसरी येथे करण्यात आली.

मनोज रघुनाथ तिवारी (वय 31, रा. यमुनानगर, लांडगेवस्ती भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार महादेव गारोळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यमुनानगर लांडगेवस्ती येथे एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी आल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मनोज तिवारी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख 83 हजार 700 रुपये किमतीचा एक किलो 837 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article