प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्या टपरी चालकाला अटक

PCB Admin
1 Min Read

वाकड, दि. 4 (पीसीबी)
शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री करणाऱ्या एका टपरी चालकाला वाकड पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 3) दुपारी दोन वाजताच्या सुमारास दत्त मंदिर रोड वाकड येथे करण्यात आली.

गणेश विठ्ठल पवळ (वय 29, रा. दत्त मंदिर रोड, वाकड) असे अटक केलेल्या टपरी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विजय भुसारे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्त मंदिर रोड वाकड येथे गणेश पवळ याचे पान टपरी आहे. त्याने टपरीमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी ठेवला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी टपरीवर कारवाई केली. कारवाई मध्ये पोलिसांनी 13 हजार 610 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article