उघड्या दरवाजा वाटे एक लाखाची चोरी

bpcauthor
1 Min Read

सांगवी, दि. 17 (पीसीबी) : घराच्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून चोरट्यांनी एक लाख 15 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 16) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास नवी सांगवी येथे घडली.

अतुल अरुण कळसाईत (वय 36, रा. विवेकानंद नगर, नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा बुधवारी सकाळी सव्वा आठ ते पावणे नऊ वाजताच्या कालावधीत उघडा होता. उघड्या दरवाजा वाटे अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातून तीस हजार रुपये किमतीचा ॲपल कंपनीचा मोबाईल, 25 हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल, 45 हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी आणि पंधरा हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी असा एकूण एक लाख 15 हजारांचा ऐवज चोरून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article