अनाथ अल्पवयीन मुलावर निवासी संस्थेतील कर्मचाऱ्याकडून लैंगिक अत्याचार

bpcauthor bpcauthor
1 Min Read

आळंदी, दि. १९ ऑगस्ट (पीसीबी) – आळंदी मधील अनाथ मुलांच्या निवासी संस्थेत देखरेख ठेवणाऱ्या कर्मचाऱ्याने एका 12 वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. ही घटना 17 ऑगस्ट रोजी पहाटे घडली. पोलिसांनी आरोपी कर्मचाऱ्याला अटक केली आहे.व्यंकटेश काशिनाथ माळनूर (रा. आळंदी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित 12 वर्षीय मुलाने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी मध्ये अनाथ मुलांच्या निवासाची व्यवस्था राखणारी संस्था आहे. त्या संस्थेत आरोपी व्यंकटेश हा देखरेख ठेवण्याचे काम करतो. तर पीडित मुलगा अनाथ असून तो त्या संस्थेत निवास करत असून बाहेर एका शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहे.

शनिवारी पहाटे पाच वाजता आरोपी हा पीडित मुलाच्या खोलीत आला. त्याने मुलाला उठवले. टिव्ही रूम मध्ये नेले. तिथे मुलाला मोबाईल पाहायला देऊन त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article