शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत फसवणूक

bpcauthor
1 Min Read

सांगवी, दि. २१ (पीसीबी) – शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत एका व्यक्तीची 65 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 3 डिसेंबर 2023 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत सांगवी येथे घडली.

धनंजय सिन्हा, अनुसूया गुप्ता (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी सोबत इन्स्टाग्रामवरून संपर्क साधला. त्यांना व्हेलस कॅपिटल कंपनीत गुंतवणूक करण्याबाबत जाहिरात दाखवून व्हाटस अप ग्रुपची लिंक पाठवली. फिर्यादीस ग्रुपमध्ये समाविष्ट करून त्यांना एक अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. शेअर खरेदी केल्यास त्यावर तीन पट नफा होईल, असे आमिष दाखवून फिर्यादीला 65 हजार रुपये गुंतवण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांनी गुंतवलेली रक्कम व परतावा न देता त्यांची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article