देहूगाव येथे धोकादायकपणे गॅसची चोरी; एकावर गुन्हा दाखल

bpcauthor bpcauthor
1 Min Read

देहूगाव, दि. २२ (पीसीबी) – देहूगाव येथे धोकादायकपणे, बेकायदेशीररित्या घरगुती भरलेल्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये गॅस चोरून काढल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. 19) रात्री देहूरोड पोलिसांनी ही कारवाई केली.

अनिल मोहन पानकर (वय 30, रा. देहूगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार युवराज माने यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल पानकर याने ज्वालाग्रही पदार्थांबाबत पुरेसा बंदोबस्त करण्याचे टाळून त्याच्या ताब्यातील भरलेल्या सिलेंडर मधून चार व पाच किलो वजनाच्या सिलेंडर मध्ये गॅस काढून घेतला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर देहूरोड पोलिसांनी कारवाई करत अनिल याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article