डॉ.नंदकिशोर कपोते यांच्या नृत्याचे अम्मां कडुन कौतुक.

PCB Admin
1 Min Read

आंतरराष्ट्रीय कीर्ती चे कथक नर्तक डॉ.नंदकिशोर कपोते यांनी दिनांक १४ नोव्हेंबर रोजी माता अमृतानंदमयी अम्मा यांच्या समोर कथक नृत्य सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. तर स्वता: अम्मां नी टाळ्या वाजवून दाद दिली. कार्यक्रमानंतर अम्मां चे दर्शन घेताना अम्मां नी डॉ.नंदकिशोर यांचे कौतुक करून कार्यक्रम खूप आवडल्याचे सांगीतले व नृत्यासाठी नंदकिशोर यांनी परिधान केलेला पोशाख ही आवडल्याचे सांगीतले. डॉ.नंदकिशोर कपोते यांनी आपल्या सादरीकरणात पं.बिरजूमहाराज यांनी लिहिलेले ” गोविंदा गोपाल मुरारी” हे भजन, अबीर गुलाल हा अभंग, परमेलु, परन,तिहाई, तोडा इ. चीजा केल्या तर त्यांनी सादर केलेल्या जुगलबंदी ने सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. आलेल्या परदेशी पाहुण्यांनी विशेष दाद दिली. डॉ.नंदकिशोर यांना तबला पं.कालीनाथ मिश्रा, गायन पं.संजय गरुड , सतार अलका गुजर, पढंत यश तिरीशरन, हार्मोनियम गंगाधर शिंदे, पखावज द्यानेश कोकाटे यांनी साथसंगत केली.

Share This Article