गुटखा विक्री प्रकरणी दोघांना अटक

bpcauthor
1 Min Read

चिखली, दि. २२ (पीसीबी) – शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 20) दुपारी कुदळवाडी-चिखली रोडवर दीपक पान शॉप मध्ये करण्यात आली.

प्रमोदकुमार श्रीराजकिशोर धुरिया, रामगोपाल धुरिया (रा कुदळवाडी, चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस अंमलदार प्रसाद जंगिलवाड यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोदकुमार याने त्याच्या पान शॉप मध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी ठेवला. याबाबत अमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली असता शनिवारी दुपारी पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. पोलिसांनी या कारवाईमध्ये 26 हजार 38 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article