तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

PCB Admin
1 Min Read

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारने तापकीरमळा चौक, काळेवाडी येथून एका तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक केली. त्याच्यासह त्याच्या साथीदाराला देखील पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 15) दुपारी करण्यात आली.

दत्ता संतोष धोत्रे (वय 21, रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. त्याच्यासह शंतनू उर्फ आदित्य दिनेश गायकवाड (वय 19) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रशांत सैद यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्ता धोत्रे याला 22 मे 2023 रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो कोणतीही परवानगी न घेता शहरात आला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट चारने कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचा मोबाईल फोन आणि कोयता असा एक लाख 46 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article