गॅस चोरी प्रकरणी तरुणास अटक

bpcauthor
1 Min Read

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून मोकळ्या सिलेंडर मध्ये गॅस चोरून काढणाऱ्या एका तरुणाला पिंपरी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 15) रात्री साडेनऊ सव्वानऊ वाजताच्या सुमारास विठ्ठलनगर पिंपरी येथे करण्यात आली.

राजेसाब मस्तानसाब मजकुरी (वय 20, रा. पाचपीर चौक, काळेवाडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विजय जानराव यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने घरगुती वापराच्या भरलेल्या सिलेंडर मधून मोकळ्या सिलेंडर मध्ये रीफिलिंग सर्किटच्या सहाय्याने गॅस चोरून काढला. याबाबत त्याने कोणतीही खबरदारी घेतली नाही. याची माहिती मिळाली असता पिंपरी पोलिसांनी कारवाई करत 24 हजारांच्या मुद्देमालासह तरुणास ताब्यात घेतले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article