लंडनवरून परतत असलेल्या व्यक्तीचे साडेसात लाखांचे दागिने लंपास

PCB Admin
1 Min Read

वाकड, दि. २ (पीसीबी) – लंडनवरून परतत असलेल्या व्यक्तीच्या सामानातून सात लाख 60 हजार रुपये किमतीचे दागिने लंपास झाले. याप्रकरणी व्यक्तीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 9 डिसेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीत घडला.

सचिन हरी कामत (वय 44, रा. वाकड. मूळ रा. युनायटेड किंगडम) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कामत हे लंडन ते मुंबई वाया जेट्टी असे विमानाने आले. लंडन येथून निघताना त्यांनी त्यांच्या सामानाच्या चार बॅग सीलबंद न करता सौदिया एअरलाईन्सकडे दिल्या. त्या चार बॅग मध्ये त्यांनी कपडे, अत्तर, चॅकलेट, इलेक्ट्रिक उपकरणे आणि 152 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ठेवले होते. कामत हे मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्यांना त्यांच्या बॅग मिळाल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी बॅगांचे आयडी मुंबई विमानतळ येथे जमा केले. त्यानंतर एका कुरिअर कंपनीद्वारे त्यांना त्यांच्या बॅग वाकड येथे मिळाल्या. त्यांनी बॅग तपासून पाहिल्या असता त्यात त्यांचे सात लाख 60 हजारांचे दागिने आढळून आले नाहीत. त्याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article